Saturday, 12 April 2014

       शब्दाविणे संवादू .....

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात पण शब्दांशिवाय बरच काही बोलून जातो यामध्ये केल्या जाणा-या देहबोलीचा, ह्स्तांदोलनामागील असणा-या भूमिकेचा आपण अजिबात विचार करत नाही यामागील कोणती धारणा असेल ? याचा आपण कटाक्षाने विचार करत नाही. परंतु ही देहबोली, हस्तांदोलन हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. परंतु ती व्यक्त करण्याची पद्धत वेगवेळ्या प्रातांत आणि देशात निरनिराळी असल्याचे दिसून येते.
     
जेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून लाभलेल्या देहाचा मोठ्या कल्पकतेने वापर करुन माणसाने इतर माणसांशी संवाद साधला आहे. इतकी देहबोली प्राचीन आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलं, तरी देहबोलीचा वापर करुन आपण तिथली भाषा अवगत नसली तरी तिथल्या रहिवाशांशी संवाद साधू शकतो; पण देहबोली ही निर्विवाद असी शास्त्रीय भाषा नाही भरपूर आणि वास्तवपूर्ण माहितीच्या आधारावर देहबोली जागली जाते. म्हणूनच स्थळ, काळ, प्रसंग यानुसार एकाच कृतीचा, एकाच चिन्हाचा अर्थ कधी सारखाच असतो तर कधी बदलतो. सर्व साधारणत: ज्या देशात राहतो, ज्या प्रातांत राहतो तिथल्या देहबोलीची आपल्याला नकळत चांगली जाणीव असते, माहिती असते परंतु परक्या मुलूखात गेलो, परदेशात गेलो आणि त्या ठिकाणच्या वापरातल्या देहबोलीची अपल्याला माहिती नसली,तर कधी-कधी विचित्र प्रसंग घडू शकतात.

हॅडशेक किंवा हस्तांदोलन हे देहबोलीतीलच नियामक खूणांमध्ये येते. दोन व्यक्तींमधला कित्येकदा हा पहिलाच शरीरस्पर्श असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जसा नमस्कार तसे पाश्चात्य लोकांमध्ये हॅडशेक!  दुस-यांचे स्वागत करण्यासाठी अभिवादनदर्शक हालचाल !जरी अनेक पाश्चात्य देशांत हॅडशेक सर्वसामान्य असला तरी पुष्कळ इतर देशांमध्ये समाजामध्ये स्वागताच्या अभिवादनाच्या वेगवेगळ्या हालचाली प्रचलित आहेत.

अरब लोक एकमेकांच्या दाढीचे चुंबन घेतात. बांटू लोक भेटल्यावर एकमेकांचे हात घट्ट पकडून सावकाश हवेत उंचावतात आणि मग सोडतात. एस्किमो लोक नाकावर नाक घासतात. कुळ्याही सामाजाच्या सांस्कृतिक चालीरीती अभ्यासताना या हालचालींना मोठे महत्त्वाचे स्थान असते.
     
हॅडशेक ही हालचाल मुख्यत: अस्तित्वात आली ती व्यक्ती निशस्त्र आहे हे दर्शविण्यासाठी. ज्या उजव्या हातात आपण शस्त्र धरतो तो हात रिकामी असल्याचे समोरच्या व्यक्तीला दिसावे शत्रूत्वाची भावना नाही. मित्रत्वाची आहे हे त्या व्यक्तीला कळावे  यासाठी हस्तांदोलन केले जाऊ लागले. सैन्यातील सॅल्यूट ही विशिष्ट हालचालही या हेतूनेच जन्मली.
     
रोमन काळात स्वागतासाठी किंवा मित्रता दर्शविण्यासाठी हस्तांदोलन करीत नसत त्यासाठी एकमेकांच्या दंडांना स्पर्श करण्याची प्रथा होती. हॅडशेक करणे, हे त्याकाळी मित्रता आणि आदरभाव दोन्ही व्यक्त करण्यासाठी हॅडशेक होऊ लागला.
    
फ्रांन्समध्ये पटकन केलेले हलके असे एकच हस्तांदोलन असते. घट्ट पकडीचे जोरात हात हलवून हस्तांदोलन करणे असभ्यपणाचे समजतात. फ्रेंच स्त्री तिचा हात प्रथम पुढे करते. तरुण लोक आणि अगदी जवळचे मित्र- मैत्रिणी दोन्ही गालांचे पुसट, उडते असे चुंबनही घेतात.
    
जर्मन लोक एकदा-दोनदा हात हलवत घट्ट पकडीचे हस्तांदोलन करतात. गालाचे चुंबन सहसा घेत नाहीत. एक हात खिशात ठेऊन दुस-या हाताने हस्तांदोलन करणे असभ्य मानतात. मुलांनी खिशात हात घालणे अनादराचे लक्षण समजतात.
    
ऑस्ट्रेलियामध्ये स्वागत करण्यासाठी मैत्रीपूर्ण पक्के (फर्म) असे हस्तांदोलन करतात. स्त्रियांशी त्यांनी आपणहून हात पुढे केल्याखेरीज हस्तांदोलन करीत नाहीत. स्त्रिया आपापसात भेटल्यावर मैत्रीदर्शक चुंबन घेतात. लांबच्या माणसाला ग्रीट करण्यासाठी हात हलवितात. ऑस्ट्रेलियन माणसं ही मैत्रीपूर्ण अनौपचारिकपणे वागणारी आणि पटकन प्रतिसाद देणारी असतात.
     
चीनी माणसं ही विशेषत: पाहुण्यांना पाश्चात्य लोकांसारखे हस्तांदोलन करण्याची प्रथा वेगाने फैलावत असली तरी मान किंचीत हलविणे किंवा वाकविणे ही स्वागताची पारंपारिक प्रथा आहे.
       
थायलंडमधील लोक आपल्याकडील नमस्ते प्रमाणेच हात जुळवून वै करतात याचा अर्थ हॅलो आभारी आहे. हात जितके वर जुळविले तेवढा अधिक आदर समजतात.
       
ब्रिटिशांचा सिंगापूरमध्ये फार प्रभाव असल्याने त्यांच्या ब-याच हालचालींचे  अनुकरण असल्याचे दिसते. भेटल्यावर हस्तांदोलन करण्याचा सामान्यत: रिवाज आहे.
     
युरोपियन लोकांपेक्षा इंग्लिश लोक थोड्या कमी प्रमाणात हस्तांदोलन करतात. अमेरिकामध्ये खूप मैत्री असेल आणि ब-याच काळाने भेट होत असेल तर स्त्रिया एकमेकींना मिठी मारतात.पुरुष स्त्रीच्या गालाचे चुंबन घेतात. पुरुष मात्र एकमेकांना मिठी मारत नाहीत. ते हस्तांदोलनाचा हात दुस-या हाताने समोरच्याचा दंड पकडतील. जपानी लोकांचे परंपरागत स्वागत म्हणजे कमरेत वाकणे. पण पाश्चिमात्यांच्या वाढत्या सहवासानमे हल्ली जपानी लोक कमी दाबाचे कमी वेळाचे हस्तांदोलनही करतात.

    तर मग आता ‘’प्रभाते करदर्शनम’’ करण्यास काहीच हरकत नाही. 

No comments:

Post a Comment