कौतुकाचा वर्षाव की सहानुभूती ??
कोकणात जायचं म्हणटलं तर साऱ्या प्रवाशांची पावलं
आपसुकच वळतात ती कोकण रेल्वेकडे... कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित नसल्याचा निर्वाळा सुरक्षा आयुक्तांनी यापूर्वीच दिला होता पण असं असलं तरी खिशाला परवडणारं तिकीट आणि जलद
गतीचा प्रवास यामुळेच कोकण रेल्वे सदानकदा ओव्हरलोडेड दिसते. रेल्वे प्रवाशांचा
प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे ट्रॅकमॅन नेहमीच
दक्ष असतात... सचिन पाडावे त्यापैकीच एक... आज सचिन पाडावे यांच्या प्रसंगावधनाने
कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले... अशा या कोकणच्या
सुपूत्राचं अनेकांनी कौतुकही केलं. बॅकस्टेजला काम करणाऱ्या कोकणपुत्राच्या
शौर्याची बातमी सर्वच न्यूज पेपरमध्ये फ्रंट पेजला छापण्यात आली होती... पण या
सचिनच्या पदरात कोकण रेल्वे प्रशासनाने मात्र फक्त ३०० रुपयांची मानधन भीक घातली. एवढचं नाही तर त्याला खडे बोलही सुनावले....
ताशी ७५ किमी वेगाने धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस त्या तुटलेल्या ट्रॅकवरुन
गेली असती तर ती थेट नदीत कोसळली असती आणि हजारो प्रवाशांना आपले प्राण गमवावे
लागले असते, मात्र ट्रॅकमॅन सचिन पाडावे
यांच्या प्रसंगावधनामुळे कोकणकन्या एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.
आपली चोख जबाबदारी पार पाडणाऱ्या सचिनच्या शौर्यामुळेच कोकणकन्या एक्सप्रेसचा
अपघात टळला...

रेल्वे
प्रशासनानं पाडावे यांना दिलेली वागणूक पाहता रेल्वे प्रशासनाची खरचं कीव वाटू लागली
आणि भर उन्हांत ट्रॅकची तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्यूटी डोळ्यासमोर
तरळू लागली...
No comments:
Post a Comment